तेलंगणा सरकारच्या महत्वाकांक्षी मेडीगट्टा प्रकल्पाचे २१ जूनला उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
तेलंगणा सरकारच्या वतीने महाराष्ट्राच्या सिमेलगत गोदावरी नदीवर मेडीगट्टा हा महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन येत्या २१ जून रोजी सकाळी १०.३०  वाजता होणार असून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल १३ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना निमंत्रण दिले आहे.
तेलंगणा राज्याच्या भुपालपल्ली जिल्ह्यातील मेडीगट्टा येथे या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सिमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर कालेश्वरम - मेडीगट्टा हा सिंचन प्रकल्प साकारण्यात आला आहे. प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आल्याचे कळते.  
मेडीगट्टा प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने मंजूरी देउ नये अशी मागणी सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांतील नागरीकांनी केली होती. या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केला होता. अनेकदा आंदोलने केली. मात्र महाराष्ट्र सरकारने तेलंगणा सरकारला प्रकल्पासाठी मंजूरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-14


Related Photos