७३८ अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासनाच्या अधिसूचनेनंतरही नियुक्तीचे आदेश नाही


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
राज्यातील सोळा आदिवासी जिल्हे व नक्षलग्रस्त भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत  सर्पदंश, विंचू दंशापासून ते शवविच्छेदनापर्यंत सर्व जबाबदारी  पडणाऱ्या  आणि  वर्षांनुवर्षे अस्थायी म्हणून सेवा देणाऱ्या ७३८ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी शासनाने अधिसूचना जारी केल्यानंतरही  नियुक्तीचे आदेश मिळाले नाही.
राज्याची प्रथमिक आरोग्य सेवा प्रामुख्याने बीएमएमएस डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. सुमारे १५ वर्षांहून अधिक काळ दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करूनही या डॉक्टरांना सेवेत कायम करण्यात आले नव्हते. दीड वर्षांपूर्वी डॉक्टरांनी आंदोलन केल्यावर शासनाने त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय  २९ ऑगस्ट २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत  घेण्यात आला. ११ जानेवारी २०१९ रोजी याबाबत अधिसूचना काढली. त्यानंतरही ४ महिने लोटल्यावरही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या डॉक्टरांना नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले  नाहीत. लोकसभा निवडणूक आचार संहितेचे कारण पुढे करत निवडणुकीनंतर आदेश दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु  आता आचारसंहिता नसल्याने  या डॉक्टरांना  तातडीने नियुक्ती आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-06-10


Related Photos