नागरिकांचे हंगामी तापाकडे दुर्लक्ष नको
- वेळेत वैद्यकीय उपचार घ्या
- आरोग्य विभागाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सध्या ताप व खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हंगामी तापाकडे दुर्लक्ष करू नये, वेळेत वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
हंगामी ताप हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो गंभीर असू शकतो. खुप उशिर होण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. हंगामी ताप सदृष्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जावून तपासणी व आवश्यक असल्यास उपचार सुरु करणे आवश्यक आहे.
संशयित हंगामी ताप रुग्णांची लक्षणे ताप, घसादुखी, खोकला, अंगदुखी, चाप लागणे आहे. संशयित हंगामी ताप व्यक्ती ते व्यक्ती, खोकणे आणि शिंकणे यातून श्वासाद्वारे, हात आणि पृष्ठ भागावर पडलेले थेंब याद्वारे पसरतो. हंगामी ताप अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये गंभीर स्वरूप धारण करु शकतो ५ वर्षाखालील मुले (विशेष करून १ वर्षाखालील बालके), ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरीक, गरोदर माता, रोग प्रतिकार शक्तींचा व्हास झालेले व्यक्ती, दिर्घकाळ औषधे घेणारे व्यक्ती, हंगामी ताप टाळण्यासाठी शिंकताना आणि खोकतांना नाक आणि तोंड झाकावे, आपले हात नियमितपणे आणि साबण आणि पाण्याने धुणे, टीश्यू पेपरचा पुनर्वापर टाळा, हस्तांदोलन करणे टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, आपले डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा, स्वताहुन औषधी घेणे टाळा, भरपुर द्रव्य पिणे, विलगीकरण राहणे.
हंगामी तापाच्या रुग्णांनी जवळच्या शासकीय आरोग्य संस्था (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अथवा सामान्य रुग्णालया) उपचारासाठी भरती व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय डॉ. दिपचंद सोयाम व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, डॉ. मिलींद सोमकुवर यांनी केले आहे.
News - Bhandara