महत्वाच्या बातम्या

 आर्वी येथे प्रधानमंत्री कौशल्य दौड मॅरेथॉन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी येथे प्रधानमंत्री कौशल्य दौड- मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजत करण्यात आले होते. मॅरेथॅानचा शुभारंभ आमदार दादाराव केचे यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

यावेळी आमदारांसह संस्था व्यवस्थापन समितीद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वीचे सदस्य कैसर अन्सारी, महेश कारेमोरे तसेच संस्थेचे प्राचार्य तुषार लोखंडे, भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक अमित वहाने, तालुका क्रीडा समन्वयक कपिल ठाकूर यांची उपस्थिती होती. या मॅरेथॅानमध्ये १३४ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रधानमंत्री कौशल्य दौड मॅरेथॉनचे बक्षीस वितरण करण्यात आले तसेच अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा २०२३ मध्ये संस्थेतील विविध व्यवसायातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभात गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाकरिता संस्थेतील शिक्षकीय व शिक्षकेत्तर कर्मचारी मुरलीधर पोरे, महेश कळमकर, महेश हरणे, सहायक अधिव्याख्याता अर्चना दुबे, धीरज सुकळकर, प्रवीण गावंडे, विजय मांजरे, भारती चव्हाटे, स्मृति मातकर, सागर गुल्हाने, योगेश खरडे, मनीष देवढे, शहेजाद शेख, संजय पारस्कर यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य तुषार लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन शासकीय तांत्रिक विद्यालयाचे सहाय्यक अधिव्याख्याता महेश हरणे यांनी केले तर आभार मेकॅनिक मोटर व्हेईकल विभागाचे शिल्प निदेशक महेश कळमकर यांनी केले.





  Print






News - Wardha




Related Photos