कोरचीत पावरग्रीडच्या टॉवरवर चढली महिला , खाली उतरिवण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न


- ३ तासानंतर महिलेला खाली उतरविण्यात यश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
  येथून २ किमी अंतरावरील नवरगाव येथे एक महिला तिव्र उच्च दाबाच्या टॉवर वर चढल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. सकाळी ८ च्या दरम्यान ही महिला टॉवर वर चढली. एक पत्रकार  खाजगी कामाने नवरगाव येथे गेले होते. यावेळी  तीथे विहिरीवर महिलांची आरडाओरड सुरु होती.  तेथे गेल्यानंतर जवळच्याच एका हायपर पावरग्रीडच्या टॉवर वर महिला चढतांना दिसली. गांभीर्य ओळखून पत्रकारांनी पोलीस व ईतरांना संपर्क साधला. लावला. यानंतर सुरु झाली तिला खाली उतरविण्याची कसरत. 
मोक्यावर पोलीस अधिकारी दहिफळे, गोडबोले, व ईतर चमू , तहसीलदार भंडारी व राजस्व विभागाचे कर्मचारी, कोरची येथील लोक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले.  ती महिला कोरची येथील असून तिचे नाव रामकली रूपेंद्र जमकातन (२४)  असे आहे. तिला २ वर्षाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसापासून ती वेडसर आहे , असे घरच्यांनी सांगितले.
पावरग्रीडच्या अती उच्च दाबामुळे तिला  काहीही होउ शकले असते.  तब्बल तीन तासानंतर अखेर त्या महिलेला सूखरूप खाली उतरविण्यात आले आहें .  तिला  तपासनीसाठी ग्रामीण रुग्णालायात दाखल करण्या आले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-05


Related Photos