महत्वाच्या बातम्या

 गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिनींग मिलधारकांनी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- कापुसावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबाबत बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिनींग मील धारकांनी मीलच्या आतील व बाहेर परिसर स्वच्छ करुन कुठेही बोंडअळीचे पतंग तयार होऊन त्याचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सुचना सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केल्या.

कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला जिल्हाधिका-यांसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे, गुणनियंत्रक परमेश्वर घायतिडक, कृषि विज्ञान केंद्र सेलसुराचे डॉ.वजीरे, सीसीआरचे प्रतिनिधी गावंडे, निविष्ठा पुरवठादार संघटनेचे प्रतिनिधी, जिनींग मीलचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिनींग मील परिसरात पडलेल्या सरकीपासुन झाडे उगवली असल्यास ती उपटून टाकून नष्ट करावी. शेंदी बोंडअळीच्या पतंगाचा अटकाव करण्यासाठी मीलच्या आवारामध्ये प्रत्येकी १० फुट अंतरावर १ कामगंधे सापळे व ल्युर्स लावण्याची कारवाई करावी. तसेच ठिकठिकाणी प्रकाश सापळे सावून संध्याकाळी ६ ते रात्री ११ वाजताच्या कालावधीत पतंग जमा होतील असे पहावे, अशा सुचना राहुल कर्डिले यांनी दिल्या.

जिनींग मिलधारकांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या एक किमी परिसरातील शेतक-यांना किंवा कमीत कमी 500 शेतक-यांना सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मोफत कामगंध सापळे लर्सु उपलब्ध करुन देण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जे जिनींग मीलधारक कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यवाही करणार नाही अशा जिनींग मील धारकांवर सार्वजनिक हितास बाधा पोहचविणे, पर्यावरणास धोका निर्माण करणे या बाबी अंतर्गत पर्यावरण कायद्यांनुसार कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्ह्यात आर्थिक नुकसानीच्या पातळीवर वर्धा तालुक्यातील पवनार, पेठ, केळापूर देवळी तालुक्यातील कोळोना चोरे व आर्वी तालुक्यातील रसुलाबाद येथील शेतक-यांच्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे शेतक-यांनी शेतामध्ये फेरोमेन ट्रॅप  लुर्स लावावे यासाठी निविष्ठा कंपनीकडून शेतक-यांनी लुर्स खरेदी केल्यास अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच एनएफएसएम कॉटन मध्ये पिक संरक्षण औषधी व बायो एजंट या बाबी अंतर्गत ५० टक्के किंवा ५०० रुपये प्रति हेक्टरी अनुदान आपत्कालीन जैविक व रासायनिक निविष्ठांचा पुरवठा ५० टक्के किंवा ७५० रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे अनुदान देण्यात येते. त्यामुळे शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी  केले.





  Print






News - Wardha




Related Photos