महत्वाच्या बातम्या

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे : खा. रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म अंत्यत गरीब कुंटुंबात झाला, जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते खचले नाहीत. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. भरपूर प्रमाणात कथा, कादंबऱ्या, लावणी, पोवाडे लिहून मराठी साहित्यात आपले अढळ स्थान निर्माण केले. ज्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली, ज्यानी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे ज्यांचे साहित्य २७ देशात वाचायला मिळते, त्यांनी समाजामध्ये जनजागृती करण्याचे महत्वपुर्ण कार्य साहित्याच्या माध्यमातुन केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी यावेळी केले.

देवळी येथील साहित्यरत्न डॉ. अन्नाभाऊ साठे सभागृहात साहित्यरत्न डॉ. अन्नाभाऊ साठे यांनी १०२ जयंती कार्यक्रम खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

यावेळी राष्ट्रीय लहूशक्ती संघटना वर्धा अध्यक्ष राष्ट्रीय विलास डोंगरे, ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, राहुल चोपडा, दशरथ भुजाडे, नंदकिशोर वैद्य, अशोक डोंगरे उपस्थित होते. साहित्य रत्न डॉ. अन्नाभाऊ साठे सभागृह परीसरातील सरक्षण भिंतीचा उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, नंदकिशोर वैद्य यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.

यावेळी प्रास्ताविक राष्ट्रीय लहूशक्ती संघटना वर्धा अध्यक्ष राष्ट्रीय विलास डोंगरे यांनी तर संचालन व आभार विनोद शिखरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अन्नाभाऊ साठे विचारमंच देवळीचे सदस्य, अनिल बाघमारे, आकाश गवई, प्रल्हाद बावणे, शिवराज डोंगरे, संजय शिखरे, सतिष पिठे यांनी प्रयत्न केले, यावेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos