नागपुरात ‘हल्दीराम’ रेस्टॉरंटमधील मेदूवड्यासोबतच्या सांबारमध्ये आढळले पालीचे मृत पिल्लू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
अजनी चौकातील   ‘हल्दीराम’ रेस्टॉरंटमधील मेदूवड्यासोबतच्या सांबारमध्ये पालीचे मृत पिल्लू आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार वर्धा येथे राहणारे यश अग्निहोत्री व  त्यांचे कुटुंबीय    ‘हल्दीराम’च्या रेस्टॉरंटमध्ये गेले. त्यांनी मेदूवडा मागवला होता. मेदूवड्यासोबतच्या सांबारमध्ये पालीचे मृत पिल्लू होते. हा प्रकार अग्निहोत्री यांनी मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. सांबारमुळे अग्निहोत्री यांच्या कुटुंबातील दोघांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
यश अग्निहोत्री यांनी या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) तक्रार दिली आहे. अग्निहोत्री यांनी पुरावा म्हणून छायाचित्र तसेच खाद्यपदार्थाचे बिलही सादर केले आहेत. एफडीएने आता याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.    Print


News - Nagpur | Posted : 2019-05-15


Related Photos