मोटारसायकल चोरट्यास २४ तासात अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
तळोधी पोलिसांनी दुचाकी चोरट्यास २४  तासात जेरबंद केले आहे. चोरट्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राजु बालाजी धुर्वे (२५) रा. धामनगाव चक असे चोरट्याचे नाव आहे.
फिर्यादी निकेश वसंता खोब्रागडे रा. काजळसर ता. चिमूर यांनी १० मे रोजी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या नातेवाईकांकडे आल्यानंतर नांदेड, तळोधी येथून त्यांची दुचाकी रात्री चोरीस गेली होती. एमएच ३१ बीएक्स ७५४ या क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लंपास केली. तळोधी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील नागरीकांना विचारपूस केली असता तपासादरम्यान १२ मे रोजी एक संशयीत दुचाकी वाहन घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली. चौकशीदरम्यान त्याने याआधीसुध्दा दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. त्याच्या घराची झडती घेतली असता चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-14


Related Photos