महत्वाच्या बातम्या

 उखर्डा : शिकारीचा प्रयत्न करणारे दोघे वन विभागाच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा तालुक्यातील उखर्डा येथील सर्वे क्रमांक २८ झुडपी जंगलामध्ये दोन व्यक्ती संशयास्पद आढळून आल्या त्यांना वनविभागाने ताब्यात घेतले, असता त्यांच्याकडून जिवंत ससा व शिकारीचे साहित्य जप्त केले. 

वरोरा वन विभागाचे पथक गस्त घालत असताना झुडपी जंगलात विनोद किसन राऊत व विनोद विनायक पवार राहणार दोघे उमर विहीर तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ हे संशयास्पद आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील जिवंत ससा शिकारीचे साहित्य व दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

सदर कारवाई विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक आदेश कुमार शेडगे यांच्या मार्गदर्शनात वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, क्षेत्र सहाय्यक ज्ञानेश्वर चांभारे, जितेंद्र लोणकर, संजय खोब्रागडे, गौरव केजकर, संतोष वेदांती, अमोल तिखट, अमोल नेवारे आदींनी केली. 





  Print






News - Chandrapur




Related Photos