देसाईगंज येथील हनुमान वार्डात शिरले वैनगंगा नदीचे पाणी


- अनेक घरे रिकामे करून लोकांना सुखरूप स्थळी पोहोचविले 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
  गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला असून  देसाईगंज येथील हनुमान वार्डात पाणी  शिरले आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 
सततच्या संततधार पावसाने विदर्भातील गडचिरोली,चंद्रपूर, गोंदिया,नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील संपुर्ण तालुक्याला मुसळधार पाऊसाने झोडपले असून जिल्ह्यात सगळीकडे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे भामरागड सारख्या तालुक्याला सहाव्यांदा पुराने वेढले आहे. अशा परिस्थितीत गावागावातून पावसाचे पाणी ओसरत नाही तोच आधीच्या मुसळधार पावसामूळे जिल्ह्यातून वाहणारी मुख्यनदी वैनगंगा ही दुथळी भरून वाहत होती. अशातच लगतच्या भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने सतर्कतेचा इशारा देऊन मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. दोन दिवसांपासून गोसेखुर्द धरणातून १३७३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोसेखुर्द धरणातून १३७३९ हजार क्युसेक पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला महापूर आला आहे. तीरावरील अनेक छोट्या गावांना पाण्याचा वेढा पडला असून,देसाईगंज तालुक्यातील हनुमान वार्ड येथे राहत्या घरामध्ये अचानक वाढलेल्या पुराचे पाणी शिरल्याने वेळीच दखल घेऊन पोलीस प्रशासनाने परिसरातील नागरिकांना रात्रीच तात्काळ जवळच्या समाज मंदिरात तथा सुखरूप जागी नेऊन ठेवले.पूर पाहण्यासाठी अबालवृद्ध, महिला, युवक-युवती व पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम महसूल, पोलिस विभागाचे कर्मचारी करीत होते. जीवित अथवा आर्थिक नुकसान होवू नये, म्हणून तहसीलदार सोनवणे व पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शिवाय पोलिस व प्रशासन पुरावर लक्ष ठेवून आहेत.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-10


Related Photos