शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नियोजन बध्द कार्यक्रमाची गरज : जिल्हाधिकारी शेखर सिंह


- संशोधन व विस्तार आराखडयाबाबत कार्यशाळेचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  जिल्हातील शेतकऱ्यांचे उत्पन्न व उत्पादन वाढविण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक उपलब्धी व तंत्रज्ञानातील त्रुटी यांचा मेळ घालून सुयोग्य पध्दतीने योजना राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केले. 
 गडचिरोली जिल्हयाच्या कृषि व संलग्न सेवेसाठी पुढील पाच वर्षाकरीता  ' यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा ' तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला प्रकल्पाचे समन्वयक तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे, मत्स्यव्यवसाय उपायुक्त प्रशांत वैद्य, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वंजारी डॉ. बुरले, दुग्धव्यवसाय अधिकारी सचिन यादव, रेशिम अधिकारी राठोड, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयिका, कांता मिश्रा, जिल्हा समन्वयिका चेतना लाटकर, प्रधान मंत्री फेलो बद्री, सुधाकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भोसले, कृषि विकास अधिकारी कोळप, कृषि विज्ञान केंद्राचे ताथोड, उपविभागीय कृषि अधिकारी , पानसरे, ढोणे, तालुका कृषि अधिकारी, ठाकरे, कटरे, राजपुत, तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते.
  जिल्ह्यात ५ कृषि पर्यावरण एस झोन स्थापन करुन १५ मे पर्यंत सर्वेक्षण करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिले. प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी यथार्थदर्शी  संशोधन व विस्तार आराखडा स्वरुप, संकल्पना व पध्दती या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. गडचिरोली कृषि क्षेत्रास सहाय्यभुत ठरेल अशा कृषि , पशुधन, रेशीम , मत्स्यव्यवसाय, कृषि मालाचे विपणन, महिला बचत गटाचे सक्षमीकरण, अन्नप्रक्रिया व उद्योग यांचा समावेश असलेला आराखडा मे २०१९ अखेर तयार  होईल असा संकल्प कार्यशाळेत करण्यात आला. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-07


Related Photos