महत्वाच्या बातम्या

 शाळा अनाधिकृत असल्याचा गटशिक्षणाधिकाऱ्याचा अजबचा फतवा


- संचालक व मुख्याध्यापकाचा पत्रकार परिषदेत आरोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली : तालुक्यातील पाथरी येथे नाट्यश्री कला सामाजिक बहुउद्देशीय संस्था देसाईगंज (वडसा) द्वारा संचालित अमरदीप इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा सन  २००९- १० या सत्रात सुरू करण्यात आली. सदर शाळा ही रीतसर सुरू असताना सावली पंचायत समितीचे विद्यमान गटशिक्षणाधिकारी यांनी ही शाळा अनाधिकृत असल्याने शाळा बंद करण्यात यावी असा अजबचा फतवा जारी केला.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून सदर जारी केलेला फतवा बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक व शाळा समिती उाध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत केला. नाट्यश्री कला सामाजिक बहुउद्देशीय संस्था देसाईगंज (वडसा) द्वारा संचालित अमरदीप इंग्लिश मीडियम स्कूल ही पाथरी  येथे नियमित सुरू आहे.  या संस्थेने सन २०११- १२ या वर्षामध्ये दर्जा वाढवण्यासाठी प्राथमिक शाळेचा प्रस्ताव चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.

परंतु २८ मे २०१० च्या शासन निर्णयानुसार सदर प्रस्ताव रद्द करण्यात आला होता. सन २०१२- १३ मध्ये पुनश्च प्रस्ताव सादर करून शाळेला २७१३१३०१२०४ हा संकेतांक क्रमांक प्राप्त झाला.  त्यानुसार नर्सरी ते पाचव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण अधिकार कायद्यानुसार शासनामार्फत सवलत देण्यात आली होती. आर टी ई नूतनीकरणा करीता संस्थेने सन  २०२०- २३ मध्ये नमुना दोन नुसार प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सन २०२३- २४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे आर टी ई रजिस्ट्रेशन सुद्धा झाले.

शाळा सुरु झाल्यापासून शाळा भेटी दरम्यान संबंधित अधिकारी यांनी शाळा ही अनधिकृत असल्याबाबतचा कोणताही शेरा भेट पुस्तिकेत लिहिलेला नाही. त्यामुळे सदर शाळा ही  अनाधिकृत कशी? असा सवाल मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने पत्रकार परिषदेत केला तर सावली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जाणीवपूर्वक शाळा अनधिकृत असल्याचे पत्र देत असून आम्हाला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्यद्यापक पि. के. मेश्राम केला आहे.  

सध्या या शाळेत नर्सरी ते पाचवी पर्यंत ६८ विद्यार्थी संख्या आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी काढलेला फतवा हा निरर्थक असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा आहे.  त्यामुळे पाथरी येथील इंग्लिश मीडियम स्कूल ही सुरळीत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.    

कोट -
मागील २०१० पासून शाळा सुरळीत सुरु असून या भागात इंग्लिश मिडीयम शाळा नसल्याने या शाळेचा फायदा शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना तर अर्थिकदृष्ट्या पालकांना होत आहे. त्यामुळे शाळा बंद करण्यात येऊ नये.

- विकास ठीकरे
उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन कमेटी
अमरदीप इंग्लिश मिडीयम स्कुल पाथरी

पाथरी हा जंगलव्याप्त परिसर असून मुलाना इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये शिकवण्यासाठी सावली किंवा सिंदेवाही येथे पाठवावे  लागते. पाथरी येथे इंग्लिश मीडियम ची शाळा सुरू असून माझ्या दोन्ही मुली या शाळेत शिक्षण घेत आहेत. तर माझी मोठी मुलगी याच शाळेत आरटीई अंतर्गत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे इंग्लिश मीडियम ची शाळा सुरळीत सुरू ठेवण्यात यावी.

- कमलेश वानखेडे पालक
मा. गट शिक्षणाधिकारी यांनी ही शाळा अनधिकृत असल्याचे पत्र ग्रामपंचायत कार्यालय येथे पाठविले असता सदर पत्राच्या अनुषंगाने या शाळेचे मुख्यध्यापक यांना बोलावून कागदपत्राची पाहणी केली त्यात शिक्षण विभागाकडून २०१२ ला शाळेचा सांकेतांक क्रमांक मिळाला असल्याची कागदपत्रे आढळून सदर. त्यामूळे गटशिक्षणाधिकारी यांना ही शाळा अनधिकृत कशी?  व मागील १३ वर्षांपासून शिक्षण विभागाने काय केले? या बाबत विचारणा करण्यात आली आहे. 

-प्रफुल तुम्मे
उपसरपंच ग्रा.पं. पाथरी





  Print






News - Chandrapur




Related Photos