महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर शहरात पावसामुळे ८०४ घरांचे नुकसान पीडितांना तात्काळ नुकसानभरपाई द्या


- अन्यथा मनपासमोर आंदोलन करू : राजू झोडे यांचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरात १ जून पासून सुरू झालेल्या पावसामुळे ८०४ घरांचे नुकसान झाले तर मागील तीन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे.अशातच ३२० घरांमध्ये पाणी शिरले. तर चंद्रपूर शहरात एका घराचे पूर्ण नुकसान झाले असून ४७ घरांचे किरकोळ झाले आहे. या सर्व पीडितांना तात्काळ नुकसानभरपाई देऊन त्यांच्या निवार्याची सोय करा तसेच अन्नधान्य पूरवा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी यांनी केली आहे. अन्यथा मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करणार असल्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.

 चंद्रपूर शहरात मंगळवारी एका दिवसातील अतिवृष्टीमुळे २४० मिलीमीटर पाऊस पडला. यात ३२० घरांमध्ये पाणी शिरले. चंद्रपूर शहरात एका घराचे पूर्ण नुकसान झाले असून ४७ घरांचे किरकोळ नुकसान झालेले आहे. तर आतापर्यंत १ जूनपासून झालेल्या पावसामुळे ८०४ घरांचे नुकसान झाले आहे. तशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या सर्वांचे पंचनामे तातडीने करून मदतकार्य करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. मात्र पंचनामे करून नागरिकांना तात्पुरती स्वरूपात रकम दिली जाते. तेव्हा तात्पुरती रकम न देता त्यांना पुर्णतः नुकसानभरपाई देण्यात यावी व यापुढे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.






  Print






News - Chandrapur




Related Photos