महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही तालुक्यातील अवैध रेती तस्करी व साठवणूकीवर पायबंद घाला


- शिवसेना (शिंदे गट) नेताजी गहाने तालुका प्रमुख, जालिंदर गायकवाड उपतालुका प्रमुख यांचे तहसीलदार यांना दिले निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रेती साठवणूक व अवैधरित्या रेती तस्करी वाढलेली असून रेती तस्करी ही रात्रीच्या वेळेस आणि अनियंत्रीत वाहतुक होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. तालुक्यात सात ते आठ रेतीघाट असून या रेती घाटमधून मोठ्याप्रमाणात तस्करी होत असल्याने शासनाचा लाखो रूपयांचा  महसूल बुडत असून महसूल विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

हा रेती तस्करीचा खेळ रात्रीच्या वेळेस चालतो, मोठ्या प्रमाणात सिंदेवाही तालुक्यात रेती उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन बऱ्याच दिवसांपासून सुरु असून याचा वाली कुणीच नाही का? असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या तस्करी आणि साठवणुकीवर आळा घालावे व वरिष्ठ पातळीवर, पत्र व्यवहार करून शासनाच्या नजरेत आणून द्यावे आणि जातीने लक्ष घालुन पायबंद करावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुण आंदोलन करावे लागेला, असा इशारा दिला आहे.

याकरीता तस्करीवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी उपाययोजना करून ही तस्करी बंद करावी, अशी मागणी (शिंदे गट) शिवसेना सिंदेवाही तालुका अध्यक्ष नेताजी गहाने आणि उपतालुका प्रमुख जालींदर गायकवाड यांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos