महत्वाच्या बातम्या

 पहिली प्रवेशाचे वय सहा वर्षे : केंद्राच्या सर्व राज्यांना सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई :
वय वर्षे सहा पूर्ण असणाऱ्या बालकाला इयत्ता पहिलीत प्रवेश द्या, अशा सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. देशातील सर्व राज्यांमधील शाळांत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या वयामध्ये भिन्नता आहे. त्यामुळे देशपातळीवर पहिली प्रवेशाचे वय समान असावे यासाठी केंद्राने सूचना जारी केल्या आहेत. देशात वर्ष 2020 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशपातळीवर पहिली प्रवेशाचे वय समान ठेवण्याचा केंद्राचा विचार आहे.

देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 6 वर्षे पूर्ण नसणाऱ्या बालकांना पहिलीत प्रवेश देण्यात येतो. अशा राज्यांसाठी केंद्राने या सूचना दिल्या आहेत. आसाम, गुजरात, तेलंगणा, पुदुचेरी, लडाखमध्ये 5 वर्षे वय असलेल्या बालकांना पहिलीत प्रवेश दिला जातो. तर आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हरयाणा, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ राज्यात 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बालकांना पहिलीत प्रवेश दिला जातो.





  Print






News - Rajy




Related Photos