विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला काँग्रेस - राकॉ पदाधिकाऱ्यांचा विरोध


- बाळू धानोरकर यांना तिकीट देण्याबाबत पदाधिकाऱ्यांचा एल्गार 
- वरोरा भद्रावती विधानसभेचे पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर - आर्णी मतदार संघातील भाजपचा उमेदवार घोषित झाल्या नंतर काँग्रेस कडून बहुचर्चित उमेदवार बाळू धानोरकर यांना तिकीट नाकारून काँग्रेसचे जुने कार्यकर्ते विनायक बांगडे यांना तिकीट देण्यात आल्याच्या घोषणेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.  जिल्ह्यात प्रथमच  एक दमदार उमेदवार काँग्रेसला मिळाला असताना सुद्धा त्याला तिकीट नाकारून पक्षाने एक कमजोर उमेदवार उभा केलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपाला सोपी जाणार आहे पक्षाने आपला निर्णय बदलवावा अशी मागणी घेवून पदाधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारून निषेध व्यक्त केला.
 बाळू  धानोरकर शिवसेनेचे आमदार असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेस पक्षाकडून  निवडणूक लढविण्यास उत्सुक असताना व काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना शब्द दिला असताना सुद्धा ऐन वेळेवर त्यांना तिकीट काढून विनायक बागडे यांना तिकीट देण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजप २० वर्षापासून सत्तेत आहे .यावेळी जिल्ह्यात भाजप विरोधी लाटताना व काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असताना सुद्धा एक दमदार उमेदवाराला वगळून फक्त ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून विनायक बागडे यांना तिकीट देणे हा काँग्रेसचा आत्मघाती निर्णय आहे.  या निर्णयाचे काँग्रेस  राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांकडून मोठा विरोध होत आहे.  आज वरोरा भद्रावती विधानसभेचे  काँग्रेस पदाधिकारी यांनी रस्त्यावर उतरून काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींचा  निर्णयाचा जोरदार विरोध केला . बाळू धानोरकर याना तिकीट मिळायलाच पाहिजे अशी घोषणाबाजी केली. जर काँग्रेस पक्षश्रेष्टीं आपला निर्णय बदलणार नाही तर आपले सामूहिक राजीनामे देण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. पक्षश्रेष्ठी  यावर कसा  निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनात काँग्रेसचे वसंत विधाते, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल धोटे , झोटिंग,  सभापती छोटू भाई शेख , राजू मिश्रा,   अशोक राजा , आशिक रजा , विठ्ठल ताले,  राहुल देवडे,  संदीप सोनेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-23


Related Photos