महत्वाच्या बातम्या

 ई.व्ही.एम/व्हीव्हीपॅट मशीनची प्रथमस्तरीय तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम/व्हिव्हीपॅट मशिनची प्रथमस्तरीय तपासणी आज 4 जुलै ला करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी यांच्या देखरेखीखाली बी.ई.एल. कंपनीच्या अभियंत्यामार्फत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नवीन गोदाम येथे आज पासून तपासणीला सुरूवात झाली.

सदर तपासणीमध्ये बैलेट यूनिट (बीयु) 8527, कंट्रोल यूनिट (सीयू) 4897 व VVPAT 5357 असे एकुण 18781 ईवीएम/व्हीव्हीपॅट मशिन्स प्रथमस्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी (म. रा.) आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी या संपूर्ण तपासणी प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात आले. तसेच तपासणी वेळी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश प्रतिबंध करण्यात आला. यासाठी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. या तपासणीबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना 19 जुन 2023 रोजी या तपासणीबाबत माहिती देण्यात आली होती, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos