महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची श्रीकृष्ण नाम संकीर्तन महानामयज्ञ कार्यक्रमाला उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : तालुक्यातील शांतीग्राम येथे १६ ते १८ फेब्रुवारी पर्यंत हरे कृष्ण पूजा व महानाम यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले तसेच या कार्यक्रमाला आर्थिक मदत केले. 

दरवर्षी शांतीग्राम येथील हरे कृष्ण पुजा आणि महानामयज्ञ संकीर्तन कार्यक्रम घेतले जाते. येथे झालेल्या महणाम कीर्तन कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. स्थानिक बंगाली बांधवांनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला होता. कंकडालवार यांचे गावातील आगमन होताच कमिटी तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, श्रीकांत समजदार उपसरपंच शांतिग्राम, कमल बाला, सुशील हलदार, शूजय मंडळ, सुशांत बेपरी, दिनो रॉय, शक्ती पोदर, मुकुल रॉय, आशीश पोदारसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos