महत्वाच्या बातम्या

 उद्योग शिबिरात उच्चशिक्षित समाजसेवी मोंटो मानकर यांनी लोकांना उद्योजक बनवून नवीन आदर्श केले निर्माण 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि लोकांना रोजगार द्या. या करीता सामाजिक कार्यकर्ते मोंटो मानकर यांनी मिलिंद बुध्द विहार, पठानपुरा वॉर्ड येथे आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत कृषी विभागाची महत्वकांशी योजना याचे शिबिर आयोजित करण्यात आले. 

या योजने मार्फत गरजूंना बँकेच्या माध्यमातून १ ते ४० लाख पर्यन्त लोन व तसेच ३५ % सबसिडी देण्यात येत आहे. 

लोकांनी स्वतः चा व्यवसाय सुरू करावा व उद्योजक बनावे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.

जवळपास ५० च्या वर लोकांनी उद्योजक बनण्याचा निर्धार केला व या योजने मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहेत.

आटा चक्की उद्योग, पापड निर्मिती उद्योग, चिप्स निर्मिती उद्योग व ईतर ४१ प्रकार चे उद्योग या योजनेमध्ये आहे. या कार्यक्रम ला यशस्वी बनवण्यासाठी अंकुश खरतड, प्रफुल चौधरी, विक्रांत वाघमारे, सुधीर गवळी, प्रथम मून यांनी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos