महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश नायडू यांची निवड


विदर्भ न्युज एक्सप्रेरस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे २७ जून २०२३ ला क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागा द्वारे एक पत्र काढून चंद्रपूरचे पहिले शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू राजेश नायडू यांची गोंडवाना विद्यापीठच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५७ (२) अंतर्गत गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांकळून राजेश नायडू चे अभिनंदन करण्यात येत आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत खेळाडूंच्या उत्तरोत्तर प्रगतिच्या दृष्टिने मला मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन करता येईल याचा मला आनंद आहे, तसेच मी या संधीचा लाभ घेऊन विद्यापीठ व संपूर्ण क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंचा जास्तीत जास्त चांगला  करण्याचा प्रयत्न करील.असे राजेश नायडू यांनी या प्रसंगी बोलले आहे आणि आपल्या नियुक्तीसाठी त्यांनी कुलगुरू, प्रभारी कुलगुरू, कुलसचिव, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि इतर हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos