राम मंदिराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी न्यायालयाने नेमली मध्यस्थांची समिती


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वत: आदेश देण्याऐवजी मध्यस्थांची समिती नेमण्याचा आदेश दिला आहे. ४ आठवड्याच्या आत या समितीने त्यांच्या कामकाजाला सुरूवात करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मध्यस्थांतर्फे जी सुनावणी केली जाणार आहे ती फैजाबाद इथे होणार असून या मध्यस्थता समितीमध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, माजी न्यायमूर्ती  इब्राहीम खलीफुल्ला आणि वकील श्रीराम पंचू यांचा समावेश असणार आहे. इब्राहीम खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.
मध्यस्थता समितीमध्ये जी सुनावणी होईल त्याबाबतचे वार्तांकन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, याचाच अर्थ हा होतो की या संदर्भातील कोणत्याही बातम्या देण्यास मनाई करण्यात आली आहे.  या समितीने ४ आठवड्यांच्या आत कामकाजाला सुरुवात करावी आणि आपला अहवाल हा 8 आठवड्यांपूर्वी सादर करावा असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

   Print


News - World | Posted : 2019-03-08


Related Photos