अहेरी - हैद्राबाद शिवशाही बसची करीमनगर जवळ उभ्या ट्रकला धडक, चालक आणि एक प्रवासी जागीच ठार


- अनेक प्रवासी जखमी झाल्याची शक्यता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
अहेरी आगाराची अहेरी - हैद्राबाद शिवशाही बस हैद्राबादकडे जात असताना आज पहाटे ३ ते ३.३०  वाजताच्या सुमारास तेलंगणा राज्यातील करीमनगर जवळ अपघात झाला आहे. या अपघातात बसचा चालक आणि एक प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
खामन चाऊस रा. बल्लारपूर असे मृतक चालकाचे नाव आहे. तर मृतक प्रवासी तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अहेरी येथून हैद्राबादसाठी पहाटे बस रवाना होते. ही बस सिरोंचा मार्गे जात असताना करीमनगर जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक बसली. यामध्ये चालक आणि एक प्रवासी जागीच ठार झाले. या अपघातात अन्य प्रवासी जखमी झाले आहेत, अशी माहिती अहेरी आगारातून प्राप्त झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-08


Related Photos