महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या महिंद्रा होम फायनान्सच्या व्यवस्थापकास मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी चोपले


- सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
महिंद्रा होम फायनान्सच्या कार्यालयात कार्यरत  महिला कर्मचाऱ्याशी  अश्लील वर्तन  कणाऱ्या महिंद्रा   व्यवस्थापकास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे.  चेतन दाते असे व्यवस्थापकाचे नाव असून  मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चेतन दाते हा कार्यालयातील एका  महिला कर्मचाऱ्याशी  अश्लील भाषेत बोलायचा. कामावरून काढण्याची धमकी वारंवार देत होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. शेवटी पीडित महिलेने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. मनसेच्या महिला शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांनी महिंद्रा होम फायनान्सच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थापकाला चांगलाच चोप दिला. चोप दिल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, चेतन दातेने पीडितेची माफी मागितल्याने तसेच लहान मुलगी असल्याने त्याला सोडण्यात आले.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-06


Related Photos