महत्वाच्या बातम्या

 डीईआयसी जिमबारु गडचिरोली अंतर्गत फाटलेले ओठ आणि टाळू शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : १९ जून २०२३ रोजी डिईआयसी जिल्हा महिला बाल रुग्णालय गडचिरोली येथे जिल्हा शल्यचिकित्सक गडचिरोली व वैद्यकिय अधिक्षक जिमबारु यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला, फाटलेले ओठ आणि टाळू शिबिराचे आयोजन केले असता सदर शिबिराकरिता २० रुग्णांची तपासणी करण्यात आली. व तपासणी दरम्यान ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. अशा ६ रुग्णांना शस्त्रक्रियेकरिता रुग्णांना नेल्सन हॉस्पिटल नागपूर येथे संदर्भित करण्यात आले.

डिईआयसी द्वारा जिल्ह्यातील रुग्णांना सेवेचा लाभ मिळण्याकरिता वेगवेगळी शिबिरे आयोजित करून त्यांना उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी रूग्णांना संदर्भित केले जाते. व हे उपचार आणि शस्त्रक्रिया सर्व रुग्णांना मोफत होत असते.

शिबिराच्या यशस्वी करिता सर्व डीईआयसी कर्मचारी व नेल्सन हॉस्पिटल नागपूर येथील तज्ञ टीम उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos