महत्वाच्या बातम्या

 आ. डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात उद्योग वाढीला चालना


- गिरिधारी मंत्री विदर्भ प्रदेश अध्यक्ष उद्योग आघाडी 

- गडचिरोली येथे उद्योग आघाडीची बैठक संपन्न 

- आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यामध्ये उद्योगाला मोठी संधी असून आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योगाला चांगली चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन उद्योग आघाडीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष गिरिधारी मंत्री यांनी गडचिरोली येथे झालेल्या उद्योग आघाडीच्या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी झालेल्या बैठकीला आ. डॉ. देवराव होळी, उद्योग आघाडीच्या अध्यक्षा सौ वैशालीताई हुसके, सौ वैशालीताई कोटावार, नंदिनी बंडीवार पुनमताई भैसारे, रंजीता गावडे माकडे ताई, यश तिवारी, मुकुल यांच्यासह भाजप आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अगरबत्ती उद्योगाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या व लाभांश मिळविणाऱ्या उद्योजक महिलांचा गिरिधारी मंत्री यांनी सत्कार केला.

यावेळी बोलताना गिरीधारी मंत्री म्हणाले की आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या निमंत्रणावरून आपण अनेकदा गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाच्या संदर्भात आवर्जून आलेलो आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग आघाडीची होणारी बैठक व नव्याने सुरु होणारे उद्योग, नव उद्योजकांमध्ये आलेला उत्साह हा खरोखरच वाखाण्याजोगा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos