उंदीर मारण्याचे औषध पीऊन आत्महत्येचा प्रयत्न : दोन विद्यार्थिनींचा मृत्यू , एक अत्यवस्थ


वृत्तसंस्था / बुलडाणा :   परीक्षेच्या अभ्यासाचा तणाव आल्याने खामगाव येथील दहावीतील  तीन विद्यार्थिनींनी उंदीर मारण्याचे औषध पीऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विषबाधा झाल्याने दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर एक विद्यार्थिनी अत्यावस्थ आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली. नयना सदाशिव शिंदे (१६) आणि निकिता अनिल रोहणकार (१५) अशी मृत विद्यार्थिनींची नावे असून रूपाली किशोर उनवणे (१५) हिच्यावर खामगावमध्ये उपचार सुरु आहेत. 
पाणीपुरीतून विषबाधा झाल्याने दोन मुलींचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. मात्र परीक्षेच्या तणावातून विषप्राशन केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे तपासानंतर समोर आले आहे. नयना, निकिता व रुपाली या तिघीही नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. दहावीच्या परीक्षेपूर्वी पार पडलेल्या प्रात्यक्षिक व अन्य सराव परीक्षांमध्ये कमी अ भ्यास झाल्याची भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे शुक्रवारी निकिताने उंदीर मारण्याचे औषध घरुन आणले. तिघींनी ते थोडेथोडे खाल्ले. त्यानंतर पाणीपुरी खाण्याची इच्छा झाल्याने तिघींनीही पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर त्या आपआपल्या घरी गेल्या. घरी मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरु झाल्याने पालकांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अधिक तपास केला असता अत्यवस्थ असलेल्या रूपालीने उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याची माहिती दिली.   Print


News - Rajy | Posted : 2019-02-25


Related Photos