महत्वाच्या बातम्या

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत पुणे येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण


-  जस्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हयाकरिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२२-२३ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण पुणे जिल्हयात आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रीय कांदा व लसून संशोधन केंद्र, कांदाचाळ, बटाटा मॉडेल फार्म, परदेशी भाजीपाला लागवड राजगुरुनगर, फ्लोरीकल्चर फार्म तळेगाव दाभाडे, कृषि विज्ञान केंद्र बारामती आदीबाबत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान लाभ घेतलेला, लाभ घेणारा, लाभ इच्छुक असलेल्या शेतक-यांनी १५ नोव्हेंबर पर्यंत संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन नागपूर व काटोल उपविभागीय कृषी अधिकारी  ए. एम. कुसळकर यांनी केले आहे.
प्रक्षेत्र प्रशिक्षण फळबाग, भाजीपाला फुले लागवड, कांदाचाळ, संरक्षित शेती, एकात्मिक किड रोग / अन्नद्रव्य व्यवस्थापन काढणीपश्चात व्यवस्थापन आदीबाबत मार्गदर्शन, कृषि पर्यटन या विषयावर प्रशिक्षण देण्यात येईल. प्रक्षेत्र प्रशिक्षण शक्यतो २० ते ४० शेतक-यांचा समूह असावा, मार्गदर्शक सुचनांच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून या प्रशिक्षणासाठी शेतक-यांची निवड केली जाणार आहे.
कार्यक्रमाकरिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मार्गदर्शक सूचनेनूसार राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण या बाबीसाठी खर्चाचे मापदंडानूसार प्रति शेतकरी प्रती दिन १ हजार रुपये याप्रमाणे जास्तीतजास्त ५ दिवसाच्या प्रशिक्षणासाठी देय राहील. या व्यतिरीक्त येणारा खर्च स्वतः शेतक-यानी करावयाचा आहे.
तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी १५ नोव्हेंबर पर्यंत संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, ए. एम. कुसळकर यांनी केले आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos