महत्वाच्या बातम्या

 मका खरेदी : शेतकरी नोंदणीसाठी १५ जुनपर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

प्रतिनिधी / चंद्रपुर : पणन हंगाम २०२२-२३ रब्बी (उन्हाळी) मधील शासकीय आधारभुत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणीसाठी २० मे २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु शेतकरी हितासाठी आता मुदतवाढ देण्यात आली असून १५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांना मका खरेदीसाठी नोंदणी करता येणार आहे.

मका खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था, पाथरी (ता. सावली), कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा आणि कोरपना तालुका खरेदी विक्री संस्था (गोंडपिपरी), ता. गोंडपिपरी येथील केंद्रावर स्वत: हजर राहावे. शेतकरी नोंदणी करतांना हंगाम २०२२-२३ पासून ज्या शेतकऱ्यांचा सातबारा आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री करावयाची आहे. त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos