महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


११ जून महत्वाच्या घटना

१६६५ : मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

१८६६ : अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

१८९५ : पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.

१९०१ : न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.

१९०७ : नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

१९३५ : एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

१९३७ : जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.

१९७० : अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

१९७२ : दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.

१९९७ : सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

१९९८ : कॉम्पॅक कॉम्पुटर कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.

२००४ : कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

२००७ : बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.

११ जून जन्म

१८१५ : भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८७९)

१८९४ : टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९५२)

१८९७ : क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)

१९४८ : बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म.

१९८२ : टंबलर चे सहसंस्थापक मार्को आर्मेंट यांचा जन्म.

११ जून मृत्यू

३२३ : ३२३ ई.पुर्व : मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचे निधन. (जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६)

१७२७ : इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन. (जन्म: २८ मे १६६०)

१९२४ : इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)

१९५० : बालसाहित्यिकपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८९९)

१९८३ : भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९४)

१९०३ : सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १८७६)

१९०३ : सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८६४)

१९९७ : इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)

२००० : कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)





  Print






News - todayspecialdays




Related Photos