महत्वाच्या बातम्या

 ईव्हीएम प्रात्याक्षिक केंद्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : EVM/VVPAT संदर्भात नागरीकांमध्ये जनजागृती करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुख्य निवडणूक अधिकार, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यभरामध्ये EVM / VVPAT प्रात्याक्षि व प्रचार कार्यक्रम 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुषांगाने EVM / VVPAT जनजागृती बाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज, गडचिरोली, अहेरी यांचे कार्यालयामध्ये ईव्हीएम प्रात्याक्षिक केंद्र (EVM Demonstration Centre) स्थापन केलेले आहे.

तरी सर्व मतदारांना जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते की, ईव्हीएम प्रात्याक्षिक केंद्र (EVM Demonstration Centre) जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज, गडचिरोली, अहेरी येथे भेट द्यावी व मतदान करुन आपण दिलेल्या मताची खात्री करावी.





  Print






News - Gadchiroli




Related Photos