महत्वाच्या बातम्या

 श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलरचे सुयश : शाळेचा १००% निकाल


- बिलाल हसन खान ९२.६० टक्के घेऊन तालुक्यात प्रथम 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : दहावीच्या परीक्षेत श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलरने घवघवीत यश मिळवले.

विशेष म्हणजे तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेपैकी या शाळेतील विद्यार्थी बिलाल हसन खान ९२.६० टक्के घेऊन तालुक्यातील प्रथम येण्याचा मान मिळाला तर मंथन नंदनवार ८६.२० टक्के घेऊन शाळेतून दुसरा, सुजल आखाडे ८५.६०, राधा कोतकोंडावार ८५.६० घेतले तर परीक्षेत २६ विद्यार्थी बसलेले होते सर्व उत्तीर्ण झाले. या यशा बद्द्ल मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनिता वनमाळी, संस्थेचे सचिव मनोजभ वनमाळी, उपाध्यक्ष नूरअली पंजवणी, कोषाध्यक्ष हरिश्चंद्र बोन्द्रे, दिपक वनमाळी, दिपक बेहरे, मयूर वनमाळी, शाळेचे मुख्याध्यापक नितीन कासार, पर्यवेक्षक किरण मांडवकर तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शाळेतर्फे वर्षभराच्या अभ्यासाचे नियोजन, सर्व परीक्षा, तज्ञांचे मार्गदर्शन केल्याने विद्यार्थ्यांनी यश मिळवले, असे शाळेचे मुख्याध्यापक यांनी सत्कार समारंभ  दरम्यान सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रवी मस्के तर आभार प्रितम धोंडणे यांनी मानले यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos