महत्वाच्या बातम्या

 सीटी-१ भंडाऱ्यातून आता देसाईगंज तालुक्यातील ऐकलपुर जंगलात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : आरमोरी, देसाईगंज, लाखांदूर तालुक्यांत हल्ले करीत १३ जणांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ या वाघाने भंडारा जिल्ह्यातील कन्हाळगाव येथील तेजराम कार यांचा शुक्रवारी बळी घेतला. हा वाघ पुन्हा भंडारा जिल्ह्यातून देसाईगंज तालुक्यातील एकलपूरच्या जंगलात आला आहे. त्यामुळे पुन्हा या परिसरात दहशत पसरली आहे.लोकेशन बदलण्यात माहीर असलेल्या सीटी-१ वाघाने वन विभागाच्या नाकीनऊ आणले आहे. शुक्रवारी भंडारा जिल्ह्यात असलेला हा नरभक्षी वाघ १२ तासांनंतर सरळ पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील एकलपूरच्या जंगलात पोहचला शनिवारी दुपारच्या सुमारास वाघ कक्ष क्रमांक ८७३ मध्ये आल्याची माहिती मिळताच शार्प शूटर, वनविभागाचे कर्मचारी, आरोग्य विभाग व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने शोधमोहीम सुरू करण्यात आली. वळू माता प्रजनन केंद्राच्या मागील जंगलाच्या परिसरात रेडकूही बांधण्यात आले. ते त्याने फस्तही केले; पण चकविण्यात माहीर असलेल्या वाघाने शार्प शूटरला हुलकावणी दिली.

एकलपूर ते देसाईगंज मार्ग केला बंद

वाघाचा ठरलेला मार्ग नाही. जंगली भागातून जाणाच्या रस्त्यांनी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. एकलपूर ते वडसा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जंगल परिसरातील एकलपूर, विसोरा या ठिकाणी वनविभागाने मुणारी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos