छत्तीसगड मध्ये १० नक्षल्यांचा खात्मा : घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बीजापूर  :
छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात नक्षल आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी सकाळी चकमक झाली.या चकमकीत दहा नक्षल्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. 
प्राप्त माहितीनुसार,  शोधमोहीम सुरू असताना नक्षल्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एकूण दहा नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला आहे.  तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. 
सदर कारवाई एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्ड्सच्या जवानांनी केली.   Print


News - World | Posted : 2019-02-07


Related Photos