महत्वाच्या बातम्या

 महिला रोजगार मेळाव्यात ४८ महिला उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती


- लवकरच देणार नियुक्ती पत्र
- २५ महिला उमेदवारांना सेवायोजन कार्ड वितरीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : रोजगार कार्यालयातर्फे काल विशेष महिला व युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मेळाव्यातच शासन आपल्या दारी या अभियानातंर्गत एकूण २५ उमेदवारांची प्रत्यक्ष कार्यालयात सेवायोजन नोंदणी करून त्यांना सेवायोजन कार्ड वितरीत करण्यात आले.
शासन आपल्या दारी या अभियानातंर्गत महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन महिला रोजगार मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यात ६६ महिला उमेदवारांनी ऑफलाईन नोंदणी तर ६३ महिला उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.
रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे या होत्या. यावेळी सहायक आयुक्त सुधाकर झळके, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाऊराव निंबार्ते, एलआयसी लाईफ प्लस साकोली ब्रांचचे नितीन रहानडाले, धनंजय हेडाऊ, आनंद चौधरी व एलआयसी लाईफ इन्शुरन्स भंडाराचे राकेश बाभटे व प्रणव गजभीये आदी उपस्थित होते.
खाजगी क्षेत्र हे खुप व्यापक असून त्यामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी व मोठया प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध आहेत. युवतींना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी प्राप्त करून आपला आर्थिक स्तर उंचवावा, असे आवाहन यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ यांनी केले. युवतींना खाजगी क्षेत्रामध्ये रेाजगार/स्वयंरोजगार प्राप्त करून स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या आईवडीलांना आर्थिक हातभार लावावा असे प्रास्ताविकमध्ये झळके यांनी सांगीतले.
मेळाव्यामध्ये खाजगी कंपन्या तसेच जिल्ह्यातील आस्थापना/हॉस्पिटल यांचेमार्फत एकूण ५९ रिक्तपदे महिलांकरीता अधिसुचित करण्यात आली होती. मेळाव्यामध्ये जिल्हयातील  ६६ महिला उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित होते. एलआयसी लाईफ प्लस साकोली ब्रांचचे नितीन रहानडाले, धनंजय हेडाऊ, आनंद चौधरी यांनी ४८ महिला उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन महात्मा गांधी नॅशनल फेलो मीरा मांजरेकर यांनी केले.





  Print






News - Bhandara




Related Photos