जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं पोलीस शिपायाला चिरडले : नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील घटना


- दोघांना अटक 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं पोलीस शिपायाला चिरडल्याची घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर रात्री ११ वाजताच्या सुमारास  घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रकाश मेश्राम असं या पोलीस शिपायाचं नाव आहे. दोन महिन्या आधी तस्करांच्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना चिरडलं होतं. 
प्राप्त माहितीनुसार , यवतमाळहून नागपूरकडे जाणाऱ्या एका वाहनातून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आलं होतं. जनावरांची तस्करी करणारं वाहन रात्री अकराच्या सुमारास चेकपोस्टवर आलं. त्यावेळी पोलिसांनी वाहन थांबवण्यास सांगितलं. मात्र वाहन चालकानं वेग वाढवला आणि एका शिपायाला चिरडलं. यामध्ये शिपायाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. तस्करांनाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची दोन महिन्यातील हि दुसरी घटना असून यावर चंद्रपूर पोलीस अधीक्षक काय ठोस पाऊले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . 
   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-21


Related Photos