जवानांना सोशल मीडिया वापरु न देणं अशक्य : लष्कर प्रमुख बिपीन रावत


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : केंद्र सरकार जवानांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या वृत्तावर बोलताना  भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी जवानांना सोशल मीडिया वापरु न देणं अशक्य असल्याचं म्हटले आहे. आधुनिक युद्धनितीसाठी सोशल मीडिया महत्त्वाचा आहे. सुरक्षा यंत्रणांनी सोशल मीडियावर बंदी घालण्यापेक्षा त्याचे फायदे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वापर केला पाहिजे असेही ते म्हणाले.
बिपीन रावत यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे , आम्हाला जवानांना सोशल मीडियापासून दूर ठेवावं असा सल्ला मिळाला आहे. तुम्ही लोकांना स्मार्टफोन वापरापासून रोखू शकता का ? जर तुम्ही स्मार्टफोन वापरावर बंदी आणू शकत नसाल तर मग जवानांना सोशल मीडियाचा वापर करु देणं फायद्याचं आहे’.   या सगळ्यांदरम्यान आपण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर बोलत आहोत. जर आपल्याला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा फायदा उचलायचा असेल तर सोशल मीडियावर लक्ष दिलं पाहिजे. सध्याच्या युगात आपण सोशल मीडियाचं महत्त्व नाकारु शकत नाही’, असं बिपीन रावत यांनी सांगितलं आहे.   Print


News - World | Posted : 2018-09-04


Related Photos