महत्वाच्या बातम्या

 देवलमरी गावात अस्वच्छतेचा साम्राज्य : ग्रामपंचायतीचा दुर्लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यात गावातील मूलभूत समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. तालुक्यापासून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या देवलमरी येथील हातपंपाजवळ साचलेल्या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पुर्णपणे रस्ता चिखलमय झाल्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

तसेच देवलमरी ग्रामपंयाचत अंतर्गत येणाऱ्या काटेपल्ली, कोलपल्ली, नंदीगाव या गावामध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना येण्याजाण्यास नाहक त्रास होत असून नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. ग्रामपंचायतीमध्ये घंटा गाडी असुनही उपयोग केले जात नाही.

त्यामुळे सदर समस्येकडे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने लक्ष देवून नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी, अशी अपेक्षा नागरिकांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos