महत्वाच्या बातम्या

 कर्णधार केएल राहुल आयपीएल मधून बाहेर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : स्टार हिंदुस्थानी फलंदाज आणि लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल, आयपीएल २०२३ च्या चालू हंगामातून बाहेर पडला आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यालाही तो मुकणार आहे.

एलएसजी-सीएसके खेळानंतर राहुल स्कॅनसाठी मुंबईला गेला आणि आता ही दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे आणि तो सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२३ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. इतकेच नाही तर तो जवळपास आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना देखील खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे आणि ७ ते ११ जून दरम्यान ओव्हल येथे WTC २०२३ च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना करेल.

आरसीबी विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला झालेल्या दुखापतीनंतर करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये त्याला गंभीर दुखापत झाल्याची पुष्टी झाली आहे ज्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे सांगण्यात आला आहे.

या कठीण काळात KL ला सर्व शक्य सहकार्य देत आहोत आणि संघात तो पुन्हा सहभागी व्हावा यासाठी त्याच्यासोबत आहोत. मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याची उपस्थिती सुपर जायंट्सला जाणवेल, असे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos