महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील विविध रेल्वे थांबे पुर्ववत सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्री सकारात्मक


- खासदार रामदास तडस यांची रेल्वे मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा

- हिंगणघाट रेल्वेस्थानकासह विविध रेल्वे थांब्यांचा विषय लवकरच मार्गी लागणार.

- श्रीक्षेत्र रिध्दपूर येथील नविन रेल्वेस्थानक स्विकृत करण्याकरिता खासदारांची रेल्वे मंत्र्यांकडे विनंती.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली (वर्धा) : वर्धा लोकसभा क्षेत्रातील कोविड १९ पुर्वी मंजुर असलेले सर्व रेल्वे थांबे तात्काळ सुरु करावे तसेच प्रामुख्याने हिंगणघाट व चांदूर येथे रेल्वे गाडयांचे थांबे पुर्ववत करण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी नवी दिल्ली येथे केन्द्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटी दरम्यान रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर भेटी दरम्यान खासदार रामदास तडस यांनी हिंगणघाट येथे कोविड १९ पुर्वी १७ रेल्वे थांबे अप व डाउन स्विकृत होते व सद्यस्थिीत फक्त ४ थांबे अप व डाउन अस्तित्वात आहे. ही वस्तुस्थिती केन्द्रीय रेल्वे मंत्री यांच्या लक्षात आणून देवून या विषयीचा एक विस्तृत अहवाल लेखी स्वरुपात सादर केला. हिंगणघाट सोबतच चांदूर, धामणगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम व सिंदी येथील रेल्वे थांबे सुध्दा पुर्ववत करावे ही प्रमुख मागणी रेटून धरली. नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस यासह दोन प्रमुख पॅसेंजर सवारी रेल्वे गाडया नागपूर-भुसावल पॅसेंजर व अजनी-काजीपेठ पॅसेंजर यांचे परीचलन पुनश्च सुरु करण्याकरिता मागणी करण्यात आली, यावर रेल्वे मंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य करुन संबधीतांना सुचना दिल्या.

अमरावती जिल्हयातील श्रीक्षेत्र रिध्दपूर येथे नविन रेल्वेस्थानक निर्मीती करिता प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी रेल्वेमंत्रालयाकडे सादर झालेला असुन त्याला मान्यता देण्यात यावी. कारण महाराष्ट्र शासनाने रिध्दपूर येथे स्वतंत्र मराठी विद्यापीठ, विकास आराखडा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे अभ्यास केन्द्र स्थापन झाले असुन या ठिकाणी रेल्वे स्थानक मंजुर करावे ही मागणी देखील यावेळी रेल्वे मंत्री महोद्यांकडे करण्यात आली.

कोविड-१९ च्या काळात असाधारण परिस्थितीमुळे रेल्वे थांबे व रेल्वेसेवा प्रभावीत झालेली होती सदर सेवा पुर्ववत करण्याकरिता व लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर चर्चा करण्याकरिता आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर प्रस्तुत केल्या सर्व विषयांवर मंत्री महोदयांनी सकारात्मक आश्वासन दिले असुन लवकरच या विषयांवर योग्य निर्णय रेल्वे विभागाकडून जाहीर होईल अशी अपेक्षा यावेळी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त करुन रेल्वे मंत्री महोदयांप्रती वेळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. 





  Print






News - Rajy




Related Photos