महत्वाच्या बातम्या

 गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : 
भारतीय जैन संघटना आणि केंद्र शासनाचे जलशक्ती मंत्रालय व पंचायतराज मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार झाल्यानुसार राज्यस्तरावर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेमध्ये संघटनेच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील जलसाठे पुर्नजिवीत करण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबविण्यात येत आहे. ४ मे ला जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व योजना प्रभावीपणे राबविण्याबाबतच्या सविस्तर सुचना केले.

या बैठकीमध्ये जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी कापगते, जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूषभ भुरावत, जैन संघटनेचे विदर्भाचे समन्वयक नितीन राजवैद्य उपस्थित होते. या योजनेतून धरणांतील गाळ काढला जाऊन पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि तोच गाळ शिवारात आल्याने उत्पादन वाढीस मदत होईल. यातून गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos