शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी दिली एटापल्लीला भेट, अपघातग्रस्तांची केली विचारपूस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / एटापल्ली :
एटापल्ली - आलापल्ली मार्गावरील गुरूपल्ली गावाजवळ १६ जानेवारी रोजी सकाळी ट्रकने बसला धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी आज १८ जानेवारी रोजी घटनास्थळी भेट देवून माहिती जाणून घेतली.
मृतकांच्या तसेच जखमींच्या कुटुंबीयांची तसेच नागरीकांची भेट घेवून परिस्थिती जाणून घेतली. रूग्णालयामध्ये भेट देवून जखमींची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसैनिक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-18


Related Photos