महत्वाच्या बातम्या

 दिल्ली आंदोलनात गेलेला स्वस्त धान्य दुकानदाराचा सव्वा महिना उलटूनही पत्ता लागेना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची तालुक्यापासून १३ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या गाहणेगाटा येथील स्वस्त धान्य दुकानदार संताराम बुधराम पोरेटी (४६) हे तालुक्यातील अकरा अन्य स्वस्त धान्य दुकानदारासह २० मार्चला दिल्ली येथे आंदोलननासाठी गेले होते. मात्र सव्वा महिन्याचा कालावधी उलटूनही संताराम परत आले नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. दिल्ली येथिल काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन सर्वजण आंदोलन स्थळी पोहचले. यादरम्यान संताराम पोरेटी हे हरवले आहे.

माहितीनुसार दिल्लीच्या नंदिग्राम पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारी नोंदवण्यात आली, पण सव्वा महिना उलटूनही त्यांचा पत्ता लागलेला नाही. अलीकडे संताराम यांचे कुटुंब चिंतेत पडले आहेत. मात्र संताराम परत येतील, अशी आशा पोरेटी कुटुंब बाळगुन आहेत. पोरेटी यांचे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, मुले असे संयुक्त कुटुंब आहे. पोरेटी कुटुंब पोलीस स्टेशन दिल्ली येथे नेहमी फोन करून विचारणा करतात. त्यांचा शोध सुरू आहे, असे पोलीस सांगतात. तर अधून मधून पोलीसांचेही फोन येतात. व संताराम घरी आला काय? असे विचारतात. यापूर्वीही एकदा ते दिल्लीला जाणार होते. मात्र त्यांच्या कुटुंबाने विरोध केला होता. अनेक वर्षापासून त्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान आहे. संताराम परत आले नसल्याने स्वस्त धान्य दुकानाची जबाबदारी पत्नी सुगंधाला सांभाळावी लागत आहे. मुलगी वैशाली संताराम पोरेटी (१९) ही नीट च्या परीक्षेसाठी नांदेडला गेली आहे. वडील परत न आल्याने ती चिंतित आहे. मुलगा ओम संताराम पोरेटी (१६) हा लाखनी सैनिक शाळेतून सुट्टी घेऊन परत आलेला आहे.

कार्यालयातून त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून कामे देऊन पाठवण्यात आले नाही. त्यांच्या संघटनेमार्फत ते त्या ठिकाणी गेले असल्याने सर्वच जिम्मेदारी त्यांच्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची आहे. - चंद्रशेखर गजभिये प्रभारी (नायब) तहसीलदार कोरची.

या संदर्भात मिटिंग ठेवण्यात आली असून मिटींगमध्ये ठरणार आहे. दिल्लीला कौन जाईल तिथे जाऊन शोध कसे घेणार कुठे राहणार यासाठी जेवढा खर्च असेल तो खर्च सुद्धा संघटना करणार आहे. - नरेंद्र वाल्दे स्वस्त धान्य दुकानदार अध्यक्ष तालुका संघटना बेळगाव/ कोरची





  Print






News - Gadchiroli




Related Photos