महत्वाच्या बातम्या

 दुचाकी चोरट्यांना अटक : भद्रावती


-भद्रावती पोलिसांची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरात हॅंडल लॉक नसलेल्या दुचाकी चोरून त्यांचे चेसिस नंबर वर दुसरा नंबर टाकून गाडीचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या टोळीला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. यात चार आरोपींना अटक करण्यात आली असून एकुण १,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

भद्रावती शहरात दुचाकी वाहन चोरीचे प्रकरण वाढत असतांना भद्रावती पोलिसांनी गस्त वाढवत गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता आरोपींनी वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.  कुणाल हरिदास उईके वय २१ वर्ष, रा. शिवाजी नगर, यश संजय कामतवार वय १९ वर्ष, रा. विजासन, राहूल नागोबा बावणे वय २१ वर्ष, रा. बंगाली कॅम्प व प्रवीण बंडू मांढरे वय २३ वर्ष रा विजासन सर्व राहणार भद्रावती शहर यांना अटक करण्यात आले.

चोरी केलेली वाहने सहज विक्री करता यावी, यासाठी आरोपींनी के. टी. एम. डुक मोटरसायकल व स्प्लेंडर मोटरसायकलचे स्पेअर पार्ट वेगळे करून काही गाड्यांचे इंजिन क्रमांक व चेसिस क्रमांक ग्राइंडर मशीन ने खोडून, त्यावर लोखंडी पंचिंग शिक्यानी दुसरे इंजिन क्रमांक व चेसिस क्रमांक बदलल्याचे आढळले त्यावरून ग्राइंडर मशीन व लोखंडी पंचिंग शिक्के जप्त करण्यात आले तसेच २ दुचाकी वाहन व दुचाकी वाहनाचे इतर सामग्री असे एकूण १,२५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नेपाणी, भद्रावती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सपोनि वर्मा, सपोनि विशाल मुळे, पोलीस अमलदार अनुप आसटूनकर, विश्वनाथ चुदरी, जगदीश झाडे, निकेश ढेंगे यानी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos