महत्वाच्या बातम्या

 महाराजस्व अभियानातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार : जि. प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन


- येमली येथे शासकीय योजनांची जत्रा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : महाराजस्व अभियानातून शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याण योजना राबविल्या जात आहेत. या अभियानातून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले आहे.

एटापल्ली तालुक्यातील आदिवासीबहुल व अतिदुर्गम येमली येथे तहसील कार्यालय मार्फत 27 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियानांतर्गत शासकीय योजनांची जत्रा, महाराजस्व अभियान घेण्यात आले.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी,माजी प स सभापती बेबीताई लेकामी,सरपंच ललिता मडावी, पोलीस पाटील, अनिल मडावी, उप सरपंच पल्लवी खोब्रागडे, माजी जि. प. सदस्य रामजी कत्तीवार, अध्यक्ष प्रभारी तहसीलदार पी व्ही चौधरी, नायब तहसीलदार ए बी भांडेकर, नायब तहसीलदार जे जि काडबाजीवार,माजी सरपंच रामा तुमरेटी, रामटेके मॅडम, विस्तार अधिकारी तुषार पवार, पांडुरंग मडावी, विजय नल्लावार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना शासकीय योजनांची जत्रा च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रलंबित प्रकरण निकाली काढून विविध दाखले, प्रमाणपत्र अद्यावत करून वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना आता कार्यालयात चकरा मारण्याची गरज नसून शासनाने उर्वरित नागरिकांची सुद्धा अशाचप्रकारे वेळेवर काम केल्यास सर्वसामान्य नागरिक नक्की या अभियानाचेच नव्हेतर संपूर्ण महसूल विभागाचे नाव घेतील.एवढेच नव्हेतर महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून दुर्गम भागात सर्वे करून नागरिकांना आवश्यक दाखले दिल्याबद्दल प्रशासनाचे त्यांनी आभार व्यक्त केले.विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करत त्यांनी शिबिरात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घेण्याचे प्रशासनाला आवाहनही केले.

येमली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानात येमली, बिड्री, ताटीगुडम, कोंदावाही, मंगुटा, पैमा स.बुर्गी स.करपनफुंडी, अबनपल्ली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियानात मान्यवरांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना तब्बल 6719 विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos