ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल फ्री दाखवण्याचे ट्रायचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने ग्राहकांचे हित लक्षात घेवून  एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल फ्री दाखवण्याचे निर्देश  केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांना दिले आहेत. 
ग्राहकांनी टीव्हीवरील १०० चॅनेलची निवड  करण्यासाठी  ३१ जानेवारीपर्यंत मुदत आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत. केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना प्रति महिना १५३.४० रुपयांप्रमाणे शंभर चॅनेल फ्री दाखवावेत. यात जीएसटीचाही समावेश असेल, असेही ट्रायने म्हटले आहे. या शंभर चॅनेलमध्ये एचडी चॅनेलचा समावेश नसणार आहे. दोन चॅनेलसोबत एक एचडी चॅनेल निवडता येवू शकते, असे काही मीडिया एजन्सीने म्हटले होते. एका चॅनेलसाठी १९ रुपये मोजण्याचा आणखी एक निर्णय ट्रायने रद्द ठरवला आहे. ग्राहकांना पसंतीची चॅनेल निवड करण्याची संधी आहे. जर यासंदर्भात काही अडचण आल्यास ट्रायने फोन नंबरवर संपर्क साधण्याचे ग्राहकांना आवाहन केले आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-14


Related Photos