एटापल्ली - गट्टा मार्ग देतोय अपघातास निमंत्रण, मुख्य रस्त्यालगतच ५ ते ६ फुटांचा खड्डा


- सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार  / भामरागड :
एटापल्ली - गट्टा मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. नेडेर गावाजवळ रस्त्याच्या बाजूला ५ ते ६  फुटांचा खड्डा पडला आहे. यामुळे मोठी वाहने काढतांना चांगलीच कसरत करावी लागते.
एटापल्ली - गट्टा मार्गाने प्रवास करताना नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्डा लक्षात न आल्यास वाहने खड्ड्यात जाण्याचा धोका आहे. यामुळे मोठी जिवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे खड्डा बुजविण्यात यावा व रस्त्याची दुरूस्ती करावी, रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos