जमिन खरेदी प्रकरणी अभाविपने घातला गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गोंडवाना विद्यापीठाच्या जागेच्या प्रश्नावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंडवाना विद्यापीठात ठिय्या मांडून कुलगुरूंना घेराव घातला.
विद्यापीठासाठी आरमोरी मार्गालगत गोगाव अडपल्ली परिसरातील जागा खरेदी करण्यात आली. मात्र खरेदी प्रक्रियेचे मुल्यांकन योग्य झाले नसून घोळ करण्यात आल्याचा आरोप अभाविपने केला आहे. काल १० जानेवारी रोजी विद्यापीठात सुरू असलेली व्यवस्थापन समितीची बैठकसुध्दा अभाविपने उधळून लावली. तसेच गुलगुरू व विद्यापीठ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कुलगुरूंनी अभाविपला जमिन खरेदी संदर्भातील घडामोडींची माहिती दिली. या प्रश्नाबाबत राज्यपालांना निवेदन सुध्दा देण्यात आले. यावेळी अभाविपचे जिल्हा संयोजक शुभम दयालवार, यश तांगडे, स्नेहीत लांजेवार, गौरव होकम, वैभव मानमुळदे, विभाग संघटनमंत्री सौरभ कावळे, क्रिष्णा पिपरे, जिल्हा संघटनमंत्री तेजस मोहतुरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-11


Related Photos