महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२४ एप्रिल महत्वाच्या घटना

१६७४ : भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.

१७१७ : खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.

१८०० : जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.

१९६७ : वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत.

१९६८ : मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश.

१९७० : गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.

१९९० : अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.

१९९३ : इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.

२०१३ : ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.

२४ एप्रिल जन्म

१८८९ : इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९५२)

१८९६ : रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९८०)

१९१० : चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)

१९२९ : कन्नड चित्रपट अभिनेता व गायक राजकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००६)

१९४२ : अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका बार्बारा स्ट्रायसँड यांचा जन्म.

१९७० : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.

१९७३ : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.

१९९३ : ७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण

२४ एप्रिल मृत्यू

१९४२ : नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९००)

१९६० : नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन.

१९७२ : चित्रकार जामिनी रॉय यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८८७)

१९७४ : देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०८)

१९९४ : उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०३)

१९९९ : चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय यांचे निधन.

२०११ : आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)

२०१४ : भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९६८)





  Print






News - todayspecialdays




Related Photos