महत्वाच्या बातम्या

 भंडारा : चुलबंध नदीच्या घाटांवरून वाळू तस्करांचा धुमाकूळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : साकोली तालुक्यातील सासरा, विहीरगाव बुराड्या, भूगाव, मिरेगाव, कटंगधरा परिसरात चुलबंद नदी घाटांवर अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या महसूल विभाग व पोलिसांवर वाळू तस्करांकडून होणारी पैशाची उधळण यावरून यांच्यातील आर्थिक हितसंबंध उतू चालल्याचे दिसून येत आहे.

वाळू उत्खननातून अल्पावधीत अमाप पैसा मिळत असल्याने सासरा, विहीरगाव, सानगडी व इतर गावातील युवक मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरला आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व शासकीय नियम पायदळी तुडवून दिवस-रात्र वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू तस्करांनी याची स्वतःची यंत्रनाही तयार केली आहे. 

सानगडी परिसरात अनेक गावात विकास कामे जोमात सुरू आहे. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यासाठी चुलबंद नदी पात्रातून अमर्यादपणे रेतीचा उपसा सुरू आहे. पूर्वी गावातील छोट्या-मोठ्या बांधकामापर्यंत मर्यादित असणारी रेतीची मागणी प्रचंड वाढली. 

रेती माफियाकडून रात्रीच्या वेळी नदीपात्रात वाहणे उभे करून त्यात रेती भरून गुपचूपपणे गावाच्या बाहेर काढून दिली जातात. या रेती उपसावर कारवाईसाठी महसूल विभागातील तहसीलदाराचे पथक कार्यरत आहे. परंतु महसूल विभागाचे कर्मचारी आर्थिक लालसेपोटी पैशाची देवाण-घेवाण करून कारवाई न करता उलट सोडून देत आहे. कारवाईसाठी येत असलेले महसूल विभागाचे कर्मचारी व पोलीस हेच रेती तस्करावर अधिकच मेहरबान असल्याने रेती तस्करीसारखे प्रकार सातत्याने घडत आहे.

महसूल विभागाच्या पथकांवर राजकीय दडपण

नदीपात्रातून चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा करायचा, काही काळ ही वाळू साठवायची, नंतर जास्त दराने रेतीची विक्री करून अमाप पैसे मिळवायचे असा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे या मार्गात अडथळा ठरणाऱ्या महसूल विभागाच्या पथकांवर राजकीय दडपण आणण्याचे प्रकार होत आहे. नदीपात्रातून रात्रीच्या वेळी वाळू उपसा केला जातो. वाळूचा अवैध उपसा केलेल्या रेतीसाठा सासरा, विहीरगाव, भूगाव, कटंगधरा, मिरेगाव घाटावरून सानगडी मार्गे इतरत्र रात्री बे रात्री, पहाटे पोहोचविले जातो.अनेक महिन्यापासून सुरू आहे. रेती तस्करीने नागरिकांची झोपमोड होत आहे.

कारवाईपुर्वीच रेती तस्कर अलर्ट

या रेती तस्करामागे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला महिन्याकाठी येथील काही रेती तस्कराकडून लाखो रुपये जमा करून पोहोचते करण्यात येत असल्याची चर्चा आहे. तो कर्मचारी कोण? असा प्रश्न आहे. रेती तस्कराची पोलीस व महसूल विभागाला माहिती दिली जाते. मात्र आर्थिक हित संबंधाने उलट या रेती तस्करांना तक्रारीची माहिती दिली जाते. साकोली महसूल विभागाचे पथक निघाले की आधीच या तस्करांना माहिती देत असल्याचेही बोलले जात आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos